अन्य

विश्वबंधुत्वाचा संदेश देत सायकल वारी ; रत्नाकर शेजवळ सहभागी

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

              संत शिरोमनी नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत पंढरपूरहून दि. ४ नोव्हेंबर रोजी घुमान (पंजाब) कडे मार्गस्थ झालेल्या सायकल रैलीत नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे खेळाडू रत्नाकर शेजवळ हे शांती, समता, बंधुतेचा संदेश घेवून घुमान कडे रवाना होत आहेत. त्यांना राॕयल रायडर्स चे संस्थापक डाॕ.आबा पाटील रेल्वे डाक सेवेचे वरिष्ठ अधिकारी रंविद्र साळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

                 रत्नाकर शेजवळ हे श्रवण दिव्यांग खेळाडू असुन याआधी त्यांनी पानिपत ते नाशिक शौर्य सायकल मोहीम १४०० किमी , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारत बांग्लादेश सद्भावना सायकल रैली २८०० किमी, मनाली ते लेह सायकल साहस मोहीम ५०० तसेच “सारे भेद सोडूया माणूस माणूस जोडूया” गागादे ते सेवाग्राम रैली सायकल वर यशस्वीपणे पुर्ण केले आहे.दररोज १०० किमी प्रवास शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी ही वारी घुमानला पोहचेलयेथे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली नामदास यांचे काल्याचे कीर्तन होईल. दि २७ नोव्हेंबर रोजी योगी निरंजननाथ यांचे संत नामदेव महाराज यांचे जीवन कार्य याविषयी व्याख्यान व सहभागी सायकल यात्रेंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

                  दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल महामहीम बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदीगड येथील राजभवनात सायकल वारीचा समारोप होईल.त्यांच्या सोबत नाशिक हून योगेश गवळी ,महेश बडगुजर व अरविंद निकुंभ हे जेष्ठ सायकलीस्ट देखील सहभागी होत आहेत. हि सायकल वारी यशस्वी व्हावी म्हणून नामदेव समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संजिव तुपसाखरे व पालखी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे झटत आहेत. 

               वरील सायकल वारीच्या स्वागतासाठी नाशिक मध्ये राॕयल रायडर्स चे संस्थापक डाॕ.आबा पाटील, स्वाप्निल भुयार, महेश भदरगे, प्रदीप भोईर, ओम सोनवने, मंगेश भदरगे, योगेश गवळी, कुंदन सोनकांबळे, सोनल कुमार आदी जय्यत तयारी करीत आहेत.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत