अन्य

आदिवासी वारली समाज उन्नती मंडळाची सभा संपन्न

Spread the love

मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

                   रविवार दि.०६/११/२०२२ रोजी आपल्या आदिवासी वारली समाज उन्नती मंडळाची ५वी मासिक सभा मोजे गांधीपुल नंदिकेश्वर मंदिर येथे संपन्न झाली यात १) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार २) शिपाई पदाचे प्रशिक्षण या विषयावर सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.

                        सकाळी 11 वाजता अशोक बाबा बात्रे ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शक का खाली विलास गिरंधले समाज मंडळ तालुका अध्यक्ष, गणेश ठाकरे सल्लागार, हेमंत शिंगडे , भास्कर भोवर सचिव. कृष्णा खरपडे, गणेश गडगे उपाध्यक्ष . खाडम बाबा, भोवर बाबा मार्गदर्शक यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. कालच्या शिपाई मार्गदर्शन सभेचे अध्यक्ष स्थान श्री. अशोक बाबा बात्रे बाबा यांनी भूषवावे अशी सूचना श्री,भालचंद्र धनगरे सरयांनी मांडली व श्री. मकरंद बात्रे यांनी त्याला अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपस्थितांच्या हस्ते कुल दैवत हिरवादेव, करंडी देव प्रतिमेला हार घालुन व श्रीफळ वाहून प्रशिक्षण सभेचे उदघाटन झाले. उद्घाटन नंतर प्रकाश निकम साहेब व देविदास काकड साहेब यांचे आगमन झाले, शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात

१)नरेश वांगड पोलिस भरती तयारी कारणे व मुलांची तयारी करून घेणे .

२) मनोज हीलीम, ३०पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग.

३) प्रतिक धनगरे २८पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग वयोगट १६.

३) माणिक वाघ चिंच तारा

 ३५पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग

४) दक्षतनया रामदास गाडर घानवल स्केटिंग गोल्ड मेडल

५) उत्कर्षा रामदास गाडर स्केटिंग गोल्ड मेडल

६)विजय वाघ चिंच तारा राज्य स्थरीय क्रीडा स्पर्धा रनिग खोखो

या सर्व मुलांचा सत्कार मान्यवर व प्रकाश निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. (सत्काराचे स्वरूप प्रमाणपत्र ,ट्रॉफी , शिवाजी महाराज प्रतिमा व १०००रू रोख असे प्रती विध्यार्थी)

               त्यानंतर निकम साहेब यांनी मार्ग दर्शन केले मार्गदर्शन बोलतांना मी समाजाचा कायम ऋणी आहे. समाजाने मला मोठे केले आहे ते मी कधीही विसरू शकनार नाही. समाज मंडळाच्या कार्यात कुठेही अडथळा येऊ नये. तसेच आर्थिक बाब कुठे कमी पडल्यास मला आवाज दया मी सदैव सहकार्य करण्यास तयार आहे असेही नमूद केले. आपली ही जी खेळाडू मुले आहेत त्यांच्या बुटाची व्यवस्था मी दोन चार दिवसात करतो असा शब्द दिला समाज मंडळाला शुभेच्छा देऊन सभेचा निरोप घेतला.

                 जिल्हा अध्यक्ष सोमा जानू तुंबडा बाबा यांचे आगमन झाले गुलाब पुष्प देऊन तालुका अध्यक्ष विलास जी गिरांधले यांनी त्यांचे स्वागत केले व शिपाई मार्गदर्शन सभेला सुरुवात झाली. खाडम बाबा व भोवर बाबा यांनी सुंदर मार्गदर्शन केले. सर्वांनी सुंदर सहभाग घेतला जिल्हा अध्यक्ष यांनी वारली समजाच्या मृतावर केल्या जाणाऱ्या क्रिया व दशक्रिया विधी याला विशेष महत्त्व कसे आहे हे खूप सुंदर रित्या पटउन दिले. मोखाडा तालुक्यात विविध विभागात वेगवेगळे रीती रिवाज आहेत त्यात एक सुत्री पणा कसा येईल यावर विशेष चर्चा झाली. सुभाष गहाले, दिपक जनाठे, गणेश नडगे, कैलास वड, प्रकाश वाजे, दशरथ बुधर पांडू जणाठे, रमेश घाटाळ, वसंत मिरके, भगीरथ भरवड, रामदास झोले, रमेश धनगरे, जयन गहले, मनोज हिलिम, माणिक वाघ. विजय वाघ, गणपत बुधर, मयूर पागी, रमेश फुपाने, बुधा भोये, नंदा भोये, भास्कर भोवर, शंकर ओलंबे, लक्ष्मण शिंगाडे, अनंता दोधाड, रामदास थालेकर, गंगाराम वांगड, मकरंद बात्रे, निवृती थाळेकर, कृष्णा खारपडे, बापू बुधर, चंद्रकांत मोहंडकर, रामदास गाडर, विकास वाडकर, यशवंत भोये, सुरेश धिंडे, भाऊ वैजल, विठल शिंगाडे, सीताराम किरकिरे, राया कुरबुडे, गणेश ठाकरे काशिनाथ ह हाडळ साहेब भालचंद्र धनगरे आदी या सर्व जणांनी सुंदर सहभाग घेतला प्रशिक्षण समजून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षस्थानी असलेले बात्रे बाबा यांनी मार्ग दर्शन केले . हेमंत शिंगडे यांनी आभार मानले. भोजन व्यवस्था गंगाराम वांगड, लक्ष्मण शिंगाडे अनंता दोधाड, विलास गिरांधले यांनी केली , ३.३०वाजता भोजन होऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत