अन्य

1520 मूर्ती, साडेचार मेट्रिक टन निर्माल्य संकलित, मनपाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेला प्रतिसाद

Spread the love

अनिस शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक

             नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील श्री गणेशोत्सव 2022 पर्यावरणपूरक होणेच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा याकरीता विविध उपक्रम देखील राबविणेत येत आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

             पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि नदीपात्रांचे जल प्रदुषण होऊ नये याकरीता श्री मुर्ती दान करणे व निर्माल्य संकलित करणे कामी महानगरपालिकेने नागरीकांना केलेल्या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. परिणामी, दिड दिवस, तीन दिवस आणि पाच दिवसांच्या श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने प्रतिसाद लाभला. नागरीकांनी उत्स्फुर्तपणे गणेश मुर्ती दान करून आणि निर्माल्य जमा करून महानगरपालिकेस मोलाचे सहकार्य केले.

1520 मूर्ती, साडेचार मेट्रिक टन निर्माल्य संकलित 

     गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सहा प्रशासकीय विभागातील कार्यक्षेत्रातील विसर्जन ठिकाणांहून एकूण 1,520 गणेश मुर्तींचे दान स्वरूपात संकलन करण्यात आले. त्याचप्रमाणे एकूण 4.665 मेट्रिक टन निर्माल्य देखील संकलित करणेत आले. श्री गणेश विसर्जन पर्यावरणपूरक होण्यासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल शहरातील नागरीकांचे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा प्रतिसाद आगामी कालावधीतील सात व दहा दिवसांचे श्री विसर्जनाचे अनुषंगाने लाभेल अशी अपेक्षा आहे. नागरीकांच्या प्रतिसादामुळे श्री विसर्जन पर्यावरणपूरक होऊन श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल असा विश्वास नाशिक महानगरपालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत