अन्य

विसर्जन स्थळे आणि गणपती मिरवणूक मार्गावर विशेष दक्षता, विविध कामांना गती

Spread the love

दानिश शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

             नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील सहा विभागातील विसर्जन स्थळे आणि मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष देऊन विविध कामे पूर्णत्वास जात आहेत. एकूण विसर्जनाच्या 71 स्थळांपैकी 29 नैसर्गिक विसर्जन ठिकाणे आणि 42 कृत्रिम तलाव या मार्गांवर दक्षता घेतली जात आहेत. या मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि गाळ काढणे आदी कामे केली पूर्णत्वास जात आहेत. चेहेडी येथे दारणा नदी किनारी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. पश्चिम विभागातील होळकर पुलाखालील गाळ काढण्यात आला आहे. याच विभागातील चोपडा लॉन्स तसेच तपोवन कपिला संगम, सीता सरोवर, पूर्व विभागातील संगम घाट, पवननगर, वडनेर गाव, पिंपळगाव खाम येथील विसर्जन घाटावर गाळ-माती काढण्यात आली आहे. पश्चिम विभागात घाट रोड आणि पार्किंग करीता काम करण्यात आले आहे.

                सातपूर प्रभाग क्रमांक २६ येथील गणेश घाटाची साफसफाई करून कच पसरवण्यात आली आहे. सातपूर आत्मामलिक गणेश विसर्जन ठिकाणी विहीरीची साफसफाई करून वाहने जाण्यासाठी खडीकरण करण्यात आले आहे. सातपूर प्रभाग क्रमांक ८ गणेश नगरमध्ये जीएसबी मटेरियलने रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. रोड साईटपट्ट्यांचे गवत काढून साफसफाई करण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १० येथे अंबड लिंक रोड पुल नंदिनी नदी या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.

               पश्चिम विभागातील संभाजी चौक ते उंटवाडी पूल दरम्यान गणपती मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. रविवार कारंजा येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर डांबराचे पॅच मारण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 6 रामवाडी पुल येथे खड्डे बुजवण्यात आले आहेत. अंबड आणि नाशिक रोड विभागात एमजी रोडवर एमएनजीएलने केलेली खोदाई बुजवण्यात आली आहे. जेल रोड मिरवणूक मार्गावरही काम करण्यात आले. सातपूर प्रभाग क्रमांक ११ रिलायन्स पेट्रोल पंप ते टीडीके कंपनी दरम्यान आणि सातपूर प्रभाग क्रमांक २६ आयटीआय पुल परीसरात खड्डे बुजवण्यात आलेत.

               नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक 23 जेएमसीटी कॉलेज समोर डीपी रस्त्यावरील रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. वडाळा रोड प्रभाक क्रमांक 23 मध्ये बीएम मटेरीअलने खड्डे भरणे आणि पॅचवर्कचे काम करण्यात आले. पेठ रोड येथे वेट मिक्स मटेरिअलने खड्डे बुजवण्यात आले आहेत. पेठ रोड येथीलच एसटी वर्क शॉपजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. नाशिक रोड विभागात जय हिंद नगरला तुटलेले ढापे बदलण्यात आले आहेत. नाशिक-पुणे मार्गावरही बीएम मटेरीअलेने पॅच वर्क करण्यात आले आहे. मा. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी कार्यवाही करीत आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत