अन्य

नाशिक महानगर पालिका आयुक्त तथा सिटीलिंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची सिटीलिंक कार्यालयाला भेट..

Spread the love

अनिस शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

              शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी नाशिक महानगर पालिका आयुक्त तथा सिटीलिंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सिटीलिंक मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी सिटीलिंक चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, वाहतूक महाव्यवस्थापक मिलिंद बंड, प्रशासन व तांत्रिक महाव्यवस्थापक वसंत गायधणी यांनी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्तांनी सिटीलिंकच्या कमांड कंट्रोल सेंटरला भेट देत संपूर्ण ऑनलाइन प्रणालीची माहिती जाणून घेतली. यामध्ये ऑटोमॅटिक व्हेइकल सिस्टिम, फ्लिट मॉनिटरिंग सिस्टिम, ग्रीवांस, फेअर कलेक्शन अशा अद्ययावत तंत्रज्ञान व कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. त्याच प्रमाणे सिटीलिंकच्या स्थापणे पासून ते आजपर्यंतच्या सिटीलिंक प्रवासाचा व कामकाजाचा आढावा आयुक्तांनी जाणून घेतला. यानंतर प्रत्यक्ष सिटीलिंक बसमध्ये चढून बस ची देखील संपूर्ण पाहणी आयुक्तांनी केली. शुक्रवारी पार पाडलेल्या या भेटी प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रीती खारतुडे, वाहतूक व्यवस्थापक राजेश वाघ, रणजीत ढाकणे, वाहतूक व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी अजित बच्छाव, जनसंपर्क अधिकारी दिपाली घाटोळ, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकारी सहाय्यक पुष्पक गोराणकर, अॅम्नेक्सचे शमीम शेख, दिनेश देसले, पिजिएमसी चे यशवंत नमासणी, अक्षय वेढणे आदि. उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत