दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता
निफाड तालुक्यात झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरा सुरु केला आहे. गोदाकाठच्या भेंडाळी येथे संजय तात्या कमानकर यांच्या वस्तीवर शनिवार दि.१६ रोजी सकाळी ११:३० वाजता मा.आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे गोदाकाठच्या शेतकऱ्यांशी संवाद साधनार आहे. यावेळी दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित रहाणार आहे. उद्या शनिवारी सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नवीन विश्वतारा लॉन्स, भेंडाळी ता.निफाड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार अनिल कदम, शिवसेना तालुकाप्रमुख सुधिर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, खंडू बोडके-पाटील यांनी केले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037