अन्य

पेठ रोड दुरुस्ती संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.

Spread the love

प्रिती पटेल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक

                   नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पेठ रोडचा पाहणी दौरा आयोजित केला होता या पाहणी दौऱ्यामध्ये आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळातर्फे त्यांना भेटून निवेदन देण्यात आले.

                    सदर रस्त्यासंदर्भात मनपा आयुक्त यांना नोव्हेंबर महिन्यात निवेदन देण्यात आले होते त्यावेळेस मनपा आयुक्तांनी निधीची कमतरता असल्याचे तोंडी कारण दिले, चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले होते व सदर रस्ता हा स्मार्ट सिटी कडे हस्तांतरित करण्यात आला आहे, तरही हा रस्ता हा तीन महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते, परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही काम सुरू झाले नाही, म्हणून पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम आदमी पक्षातर्फे आयुक्त यांना स्मरणपत्र देण्यात आले, स्मरणपत्र दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम सुरू झाले आणि पुन्हा काम बंद करण्यात आले, आज पेठ रोड येथे पालकमंत्री यांनी पाहणी दौरा केला असता आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने पेठ रस्त्यासंदर्भात त्यांना निवेदन दिले असता त्यांनी आप च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की मी या रस्त्यासाठी स्पेशल निधी मंजूर करीत आहे आणि लवकरच या पेठ रोडचे काम सुरू करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

              यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, प्रसिद्धीप्रमुख चंदन पवार, युवा आघाडी राज्य समिती सदस्य स्वप्निल घिया, युवा आघाडी सहसचिव प्रदीप लोखंडे, चंद्रशेखर महानुभव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत