अन्य

पोऱ्याचापाडा येथील ग्रामस्थांकडून विहिरीतील पाण्याची साफसफाई करण्यात आली

Spread the love

सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा

           पाणी हे निसर्गातील जीवन आहे असे म्हणायला वावगे जाणार नाही आणि ते जीवनच आहे पाण्याविना अनेक जीव राहू शकत नाही त्यासाठी काही जीवसाठी योग्य पाणी लागते ते काही असलेल्या पाण्यानी आपले जीवन जगू शकतात योग्य पाणी मिळवण्यासाठी आपल्याला त्याची योग्य ती निगा राखावी लागते तर काही जीव जंतू साठी कसे ही पाणी असले तरी त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात यामधील एक जीव असा आहे की पाणी योग्य आणि शुध्द असावा लागतो तो म्हणजेच मानवी जीवनात त्यासाठी बोर वेल, तलाव आणि विहिरी याची आपण मानवी जीवनात योग्य ती निगा राखतो ती म्हणजेच विहीर अश्याच प्रकारे पोऱ्याचापाडा ता.मोखाडा येथे ग्रामस्थांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची विहीर साफसफाई केली , विहिरीत साचलेला गाळ , दगड , काड्या , विहिरीत असलेली सर्व घाण पोऱ्याचापाडा ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढून विहीर स्वच्छ केली .

          जेणेकरून टँकरचे पाणी पिण्यास स्वच्छ मिळावे. वात्सविक रित्या हे काम ग्रामपंचायतचे असते पण ग्रामपंचायतची मदत न घेताच सदर ग्रामस्थांनी हे काम पूर्ण केले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता 

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत