अन्य

8 एप्रिल रोजी खासदार शरद पवार मोखाड्यात ऱयत शिक्षण संस्थेच्या नुतन संकुलाच्या उदघाट्न साठी येणार.आमदार सुनिल भुसारा यांनी केली ईमारतीची पाहणी

Spread the love

सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा

                   मा. खासदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ८ एप्रिल रोजी मोखाडा तालुक्यात येणार असून रयत शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विन्यान महाविद्यालयाच्या नुतन संकुलाच्या उदघाट्न तसेच या महाविद्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला वाणिज्य व विन्यान असे नामकरणही यावेळी होणार आहे यासाठी पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी दिली आहे तसेच या पार्श्वभूमीवर या संकुलाचे तसेच उदघाट्न प्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात आमदार भुसारा यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे.यामुळे पक्षाचे सर्वेसर्व आणि सर्वांचे आदरास्थान असलेले मा शरद पवार सा पहिल्यांदाच मोखाडा तालुक्यात येत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण असुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कामाला लागल्याचे चित्र आहे. मोखाड्यात शिक्षणाची वाणवा असताना तालुक्यातील मुख्यालय ते ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचे जाळे पसरवून येथील आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहचवली याच वेळी सुरवातीला अतिशय कमी जागेत कमी क्षमतेच्या ईमारतील महाविद्यालय सुरू केले यावेळी तालुक्यातील बऱ्याच दानशुरानी जागा आणि बरेचशी मदत करुन हे महाविद्यालय सुरू झाले आज याचा डोलारा उभा राहीला असून आता नवीन सुसज्ज संकुलासाठी रयत संस्थेकडुन मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून देवून खऱ्या अर्थाने आज महाविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे मोखाडावासीयांकडुन आनंद व्यक्त होत आहे.संकुलाचे बांधकाम होवून तयार झाले असून या संकुलाच्या (ईमारत) उदघाट्न साठी दस्तरखुद्द रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा शरद पवार सा येणार असल्याने महाविद्यालयाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.

                तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार भुसारा यांनीही या ईमारतीचे मंडप जेवणव्यवस्था याप्रमाणेच हॅलीपेडसाठी जागा तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची पाहणी केली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही सज्ज झाला आहे यावेळी आमचे आदरास्थान असलेले साहेब माझ्या तालुक्यात येत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे भुसारा यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील,भाजपा उपाध्यक्ष तथा अर्बन बॅंकेचे संचालक संतोष चोथे उपनगराध्यक्ष नवसु दिघा ,महाविद्यालयाचे प्राचार्य एल डी भोर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

           मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदेही येण्याची शक्यता असून ऱयत शिक्षण संस्थेचे जाळे मोखाडा तालुक्यात सर्वत्र पसरले असून शिक्षणाची गंगोत्री सर्वप्रथम पोहचवण्याचे काम याच संस्थेने तालुक्यात केले होते.यामुळे सर्वांचाच जिव्हाळ्याचा हा विषय असल्याने शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत आमंत्रण दिले असून आमदार भुसारा यांनी तसे पत्रही दिले आहे तर शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष अमोल पाटील हे वेळ घेण्यास प्रयत्नशील असून अद्याप वेळ मिळाला नसला तरी पुर्वतयारी म्हणून दोन हॅलीपेड करण्याचे ठरले आहे यामुळे अचानकपणे मुख्यमंत्री यांचे येण्याबाबत ठरू शकते अशी परीस्थिती आहे. विलास पाटील यांनी सोडवला पार्किंगच्या जागेचा प्रश्न ऱयत शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणावर नेते मंडळी रयत पदाधिकारी ग्रामस्थ आमदार खासदार उपस्थित राहणार असल्यामुळे कार्यक्रमाठीकाणी महाविद्यलायाची जागा कमी पडणार असल्याने पार्किंगच्या व्यवस्थेसाठी अडचण निर्माण झाली होती.मात्र तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीक भाजपाचे सरचिटणीस विलास पाटील यांनी पार्कींगसाठी आपली जागा उपलब्ध करून दिली असून शैक्षणिक कार्यात ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग यामुळे आधोरेखित झाला आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत