अन्य

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात

Spread the love

अर्शद अन्सारी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता जव्हार

                दि.31 रोजी पहाटे च्या सुमारास अपघातात झाला कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

                    मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहुन एक कार मुंबईच्या दिशेनं येत होती. डहाणूजवळ पोहोचले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली.

                हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. कासा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे 5 वा. सुमारास महामार्ग क्र 48 मुंबई वाहिनीने जाणारी स्कोडा कार क्र. GJ 5 CM 2222 हिचे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गुजरात लेनवर जाऊन गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या लक्सरी AR 01 P 6734 हिस समोरासमोर ठोकर मारून अपघात झाला आहे.

               सदर अपघातात मोटर कार मधील 1) मोहंमद अब्दुल सलाम हाफिसजी वय. 36 वर्षे 2) इब्राहिम दाऊद वय 60 वर्षे. 3) आसिया बेन कलेक्टर वय 57 वर्षे 4) इस्माईल महंमद देसाय वय 42 वर्षे सर्व रा. बार्डोली, जिल्हा सुरत, राज्य गुजराथ हे मयत झाले असून लक्झरी मधील 3 प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तर या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसचालक या अपघातात जखमी झाला आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत