Uncategorized अन्य

पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळी, विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज जप्त

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

              अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ वारजेमाळवाडी पोलीस ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओम साई पान शॉप कर्वेनगर गल्ली नंबर ८ चे समोर पुणे या ठिकाणी परराज्यातील इसम हा त्याचे ओम साई पान शॉप मधुन त्याचे ओळखीचे लोकांना गांजा, बंटा हे अंमली पदार्थ विक्री करीत आहे . नमुद प्रमाणे मिळालेले बातमीचे अनुषंगाने कायदेशिर कारवाई करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अधिनस्त स्टाफ, अधिकारी यांना सुचना दिल्या. त्यानुसार विभागाकडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन कर्वेनगर गल्ली नंबर ८ समोर कॅनोल रोड येथील ओम साई पान शॉप या पान टपरी मध्ये छापा कारवाई केली असता नमुद ठिकाणी इसम नामे रामबाबु देवनारायन महतो वय ३१ वर्षे, कर्वेनगर कॅनोल रोड गल्ली नंबर ८ चे समोर पुणे मुळ रा.गाव. रोहुवा, जि. सातावाडी, पोस्ट पोहबारवा राज्य बिहार हा त्याचे ओम साई पान शॉप या पान टपरीत एकुण ११० ग्रॅम गांजा, ०३ किलो ५१५ ग्रॅम बंटा मोबाईल फोन किं.रु. ४७३५०/- चा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द वारजे माळवाडी पो स्टे येथे गु र नं २७९ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) ii ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार सचिन माळवे यांनी बिबवेवाडी पो स्टे येथे फिर्याद दिली आहे

                 वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सह पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, यांनी केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क:- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत