अन्य

जव्हार मध्ये क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी बांधवाना उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते सम्मान चिन्ह देऊन गौरव

Spread the love

प्रसांत वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर

                  पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्ये मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती तसेच पालघरचे खासदार श्री.राजेद्र गावीत सुध्दा उपस्थित होते.तसेच श्री.सदिंप धुवै आमदार तथा गोंड जनजाती महासंघ महाराष्ट्र राज्य व त्याच प्रमाणे पालघरचे पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पतंगशहा कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री.रामदास मराड व नरेश मराड ‌जनजाती विकास मंच पालघर जिल्हा तसेच दामोदर थाळकर, विकास कनोजा, दिपक काकरा,राजेश कोरडा आदी मान्यवर उपस्थित होते.आदिवासी रूढी परंपरा जपुन ठेवणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात आला.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत