दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सुनील क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडल्याचे नाना जाधव या शेतकऱ्याने बघितले. त्यानंतर नाना जाधव तसेच संतोष मोगल यांनी वन्यजीव रक्षक देविदास सताळे किरण कांबळे यांना सदरील घटनेची माहिती दिली. वन्यजीव रक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनाधिकारी ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार केले. त्यानंतर मोराच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सदरील मोर हा चिंचखेड येथील फॉरेस्ट मध्ये सुखरूप सोडण्यात आला. मोराला जीवदान दिल्याने वन्यजीव रक्षक यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037