अन्य

स्वाभिमानी सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांची निवड जाहीर

Spread the love

अनीस पटेल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , चाटोरी

              येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज अन्याय – अत्याचारा विरुद्ध एकमेव लढा.. म्हणून ओळख नव्या महाराष्ट्राची सर्व सामान्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानी सेना यांची कार्यकर्ता कार्यकारीणी ची वार्षिक आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष श्री. पंजाबराव वडजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली , या बैठकीमध्ये विविध कामाचा कार्यकर्त्यांनी आपला आढावा यावेळी सादर केला, मराठवाडा संपर्क प्रमुख तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना निवडीचे नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून सर्वसामान्य गोर- गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर अंध अपंग विधवा ज्येष्ठ नागरिक यां सह दलित आदिवासी पारधी भटके – विमुक्त जाती जमाती अल्पसंख्यांक ख्रिस्ती समाज यांना न्याय मिळवून देण्यासाठी ओळख नव्या महाराष्ट्राची स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र राज्य पूर्ण पणे कटिबद्ध राहील व , ( वार्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता राष्ट्रीय एकात्मता अखंडता मानवता भाई चारा जोडो संकल्प अभियान 2022, ) राबविणार असे मत यावेळी बोलताना आदर्श युवा समाज भूषण कार्यसम्राट, जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी व्यक्त केले आहे यावेळी सैय्यद कलीम, ईमरान खान, सैय्यद एजाज, मोतीभाऊ वाघ सैय्यद काझी लियाकत अली पवन काळे, हुसेन हाजी बाबा कुरेशी, शाहिद भैय्या कुरेशी, सैय्यद रेहान , गणपत जाधव, सुनील विस्ते, सिद्धीक अन्सारी, मोबीन मुलतानी, ऐकबाल अन्सारी, आदम मोमीन, अल्ताफ पठाण आश्रफ मोमीन, शाहिद अन्सारी तौसिफ़ मुलतानी, हुसेन अन्सारी, सौं. नतिजा भोसले सौं. पुष्पाबाई पवार, आदींसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत