अन्य

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

                  द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जात. 

             स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत