Uncategorized

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत

Spread the love

सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक 

                कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडून सर्व नागरीकांना सुचना देण्यात येते की, सध्या नागरीकांना व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अॅपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी महिला चॅटींग करुन त्यामध्ये Hi, Hello, How are you असे मेसेज करते त्यानंतर ती महिला आपणास व्हिडीओ कॉल करण्यास सांगते किंवा ती स्वतः व्हिडीओ कॉल करते व्हिडीओ कॉलमध्ये तो महिला स्वतःचे कपडे काढते आणि समोरच्या व्यक्तीस देखील कपडे काढण्यास सांगते. (महिलेचा व्हिडीओ हा प्रोरेकॉर्डड असतो) त्यानंतर किडीओ कॉलमध्ये ती महिला अश्लील चा करते. हा सर्व

              प्रकरण करीत असताना स्क्रिन रेकॉर्डींग केली जाते आणि त्याचा व्हीडीओ तयार करून तो व्हिडीओ आपले मोबाईलवर पाठवीला जातो. तो व्हीडीओ आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांना पाठवू अथवा सोशल मिडीयावर व्हायरल करु असे सांगुन आपणास पैशाची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास तो अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना, मित्रांना तसेच सोशल मिडीयावर कायरल करण्याची धमकी दिली जाते. आपण पैसे न दिल्यास तोतया सायबर क्राईम पोलीस ठाणे अधिकारी यूटयूब कार्यालयीन अधिकारी, मिडीया पत्रकार इत्यादी असल्याची बतावणी करुन आपणास भिती दाखवून पैसे देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत.

              तरी सर्व नागरीकांना विनंती आहे की, आपण आपल्या मोबाईलवर व्हॉटसएप फेसबुक, मैसेंजर यावरुन कोणत्याही अनोळखी नंबरवर चॅटींग करु नये किंवा त्याचे व्हीडीओ कॉल रिसीव्ह करु नयेत. अशा नंबरवरुन तो नंबर तात्काळ ब्लॉक लोस्टमध्ये टाकावा. तसेच अशी घटना आपल्यासोबत घडल्यास 1930 या हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी.

– दौलत जाधव पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन, अहमदनगर

 

कोपरगांव तालुका पोलीसस्टेशन, कोपरगांव

दुरध्वनी क्रमांक 02423-222233 kopargaon.ps.anr@mahapolice.gov.in.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत