जे. एम. सी. टी. तंत्रनिकेतन मध्ये क्रीडा सप्ताह साजरा
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
वडाळा रोड येथील जे. एम. सी. टी. तंत्रनिकेतन महाविद्यालय व श्री साबीर बशीर शेख, (एल.आय.सी. विकास अधिकारी नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमानाने अंतर्गत क्रीडा सप्ताहाचे उत्साहात आयोजन केले गेले. उद्घाटन प्रसंगी अतिथींच्या हस्ते क्रीडाजोत प्रज्वलित करण्यात आली. प्रमुख अतिथी श्री साबीर बशीर शेख, डॉ सबिहा बशीर शेख, श्रीमती पूजा अप्पल, (मायरॉन शाळा प्राचार्य) श्रीमती हिना शेख, (रेहनुमा शाळा प्राचार्य), डॉ आरिफ मंन्सुरी, (जे. एम. सी. टी. कॅम्पस डायरेक्टर), डॉ शहजाद अन्सारी, (जे. एम. सी. टी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य), व डॉ. चित्रा घस्ते व शबाना शेख, (जे. एम. सी. टी. इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य), शेख अब्दुल हमीद (जे. एम. सी. टी. सिविल सर्विसेस अकॅडेमिचे डायरेक्टर) उपस्थित होते. प्रमुख अतिथीने आपल्या मनोगतात खेळाचे महत्व, खेळामधील करिअरच्या विविध संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य अब्दुल हमीद अन्सारी जे.एम.सी.टी तंत्रनिकेतनचे खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले, या स्पर्धेत सहभागी होणे हीच खरी जिंकण्याची भावना आहे सांघिक खेळ खेळल्याने तणावमुक्त जीवन जगता येते, आनंद मिळतो आणि मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. क्रीडा दिनानिमित्त क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, चेस, रशीखेच, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी हिसामुदीन खतीब, हाजी जाहिद खतीब, हाजी शेखन खतीब, हाजी साबीर खतीब, हाजी रऊफ पटेल, ऐहसान खतीब यांनी खेळाडूना शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना खरे यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी जे.एम.सी.टी. तंत्रनिकेचे क्रीडाशिक्षक अशरफ तुर्की यादीसह शिक्षक व शिक्षक सेवकांनी परिश्रम घेतले.