माजी महसूल मंत्री मा.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमोण विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन.प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर (निमोण) संगमनेर तालुक्यातील निमोण येथे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अमृतवाहिनी बॅंकेचे चेअरमन सुधाकर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. स्कूल कमिटीचे चेअरमन ॲड. ज्ञानेश्वर सांगळे ,प्राचार्य सोमनाथ गडाख यांचे मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य सोमनाथ गडाख ,पर्यवेक्षक बी.आर.पिंगळे ,तसेच मार्केट कमीटी संचालक अनिल शिवाजी घुगे,माजी पंचायत समिती सदस्य, चंद्रकांत घुगे,शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गोरख घुगे. डॉ.शरद घुगे, सामाजिक कार्यकर्ते डि.एम.घुगे. विजय गुंजाळ या सर्वांच्या वतीने अमृतवाहिनी बॅंकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर क्रिकेट च्या मैदानात सुधाकर जोशी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले.व नाणेफेक करून क्रिकेट च्या खेळाला सुरूवात करण्यात आली. तसेच क्रिकेट , जनरल नॉलेज,निबंध , रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा तसेच हस्ताक्षर स्पर्धा आदि विविध स्पर्धांमध्ये 600 विद्यार्थ्यी व विद्यार्थीनी सहभागी झाले आहे.
सदर स्पर्धांचे नियोजन
साहेबराव शेळके,सुदाम गोर्डे , नवनाथ कोहोकडे , क्रीडाशिक्षक अशोक कांडेकर , राजेंद्र गोडगे , बाळनाथ घुगे, श्रीम समता आल्हाट, पोपट दिघे,सुनील अभियेकर , कुंडलिक मेढे, बाळासाहेब मुर्तडक, तोडमल एस बी.,संजय जोंधळे, दुर्गा भुजबळ आदि शिक्षकांनी केले आहे.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.