नाशिक महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत शालेय शिक्षण मंत्री मा,ना, दादा भाऊ भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले
प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक आज दिनांक 3/2 /2025 रोजी माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री दादाभाऊ भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सध्या होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुस्लिम मुलींना बुर्का घालण्यास परवानगी देण्यात आली त्याबद्दल अभिनंदन करून पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच मासिक महानगरपालिके मार्फत चालवण्यात येणाऱ्या उर्दू व माध्यमिक शाळांमधील सध्या जी परिस्थिती आहे त्याबाबत अवगत करण्यात आले खऱ्या अर्थाने उर्दू शाळा या बंद होत चालले असून त्यामधील पटसंख्या अतिशय कमी झालेली आहे तसेच शिक्षकांची भूमिका डोलमोल असल्याने उर्दू शाळांचा शैक्षणिक दर्जा खलावलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन व निवेदने देऊन कोणत्याही प्रकारचा फरक झालेला नसल्याने माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमोर सर्व हकीकत मांडण्यात आली व बंद असलेल्या काही शाळा यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश स्कूलमध्ये परावर्तित करून डिजिटल शाळा बनविण्यात याव्या व अल्पसंख्याक समाजामधील खालवत चाललेला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मंत्री महोदयांना करण्यात आली सदर शिष्टमंडळामध्ये प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुक्तार शेख माजिद पठाण सलीम खान रफिक साबीर बबलू शेख अखिल खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते