डॉमीनोझ पिझा रेस्टॉरंट मध्ये तोडफोड करून दहशत माजविणा-या आरोपींच्या २४ तासाचे आत आवळल्या मुसक्या म्हसरूळ पोलीस ठाणे कडील अधिकारी/अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी.
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान दिनांक ०२/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा. चे सुमारास फिर्यादी नामे दादाजी किसन मोहिते वय ३७ वर्ष रा. गोरक्षनगर, म्हसरूळ, नाशिक हे त्यांचे डॉमीनोझ पिझा रेस्टॉरंट मध्ये कामावर असताना काही इसमांनी डॉमीनोझ पिझा रेस्टॉरंट मध्ये येवून डिलीव्हरी बॉय यांचेकडे पिझा मागीतला असता डिलीवरी बॉय यांनी गर्दी असल्याने सदर इसमांना थांबण्यास सांगीतले. त्याचा राग येवून सदर संशयीत इसमांनी रेस्टॉरंट मधील कामगारांना शिवीगाळ करून आम्हाला आताचे आता पिझा दया, आम्ही पैसे देणार नाही असे म्हणून काउंटरवर ठेवलेले संगणक, प्रिंटर उचलून रेस्टॉरंट मधील पिझा मेकर यांना फेकून मारून दहशत निर्माण केली व तेथून पळून गेले. या तक्रारी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर २८/२०२५ भा.न्या. स. कलम ११८ (१), ११५,३५२,३५१ (२), ३२४ (५) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
त्याअनुशंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्रीमती मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, श्रीमती पदमजा बढे यांनी गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वपोनि/अतुल डहाके यांनी मार्गदर्शन केले व गुन्हेशोध पथकाचे पोउपनि/दिपक पटारे, मनोहर क्षिरसागर व अंमलदार हे आरोपीताची माहिती घेत असताना पोअ/प्रशांत देवरे यांना सदरचा गुन्हा हा सुरज बाळासाहेब फड, निरज दिपक खैरनार, साहिल कैलास गायकवाड रा. स्नेहनगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ यांनी केला असल्याची खात्रीशिर गोपनिय बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीतांना २४ तासाचे आत जेरबंद केले आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्रीमती मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, श्रीमती पदमजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि/अतुल डहाके, पोउपनि/दिपक पटारे, मनोहर क्षिरसागर, पोउपनि/जोशी, पोहवा / बाळासाहेब मुर्तडक, सतिष वसावे, प्रशांत वालझाडे, पोअ/प्रशांत देवरे, गुणवंत गायकवाड, जितू शिंदे, प्रमोद गायकवाड, पोअ/ज्ञानेश्वर कातकाडे यांनी केलेली आहे.