नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाद्वारे आयोजित cctv एक्स्पो येथे मा. मंत्री महोदय श्री. गिरीश महाजन यांची भेट प्रतिनिधी माजिद खान नासिक
मा पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सुरक्षित नाशिक हि मोहीम सुरु केली आहे .
याच मोहिमेचा भाग म्हणून नाशिक शहरात cctv कव्हरेज वाढविणे बाबत पोलिस आयुक्तालय नाशिक शहर द्वारे प्रयत्न सुरु आहेत .
मा . पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी विविध आस्थापनांना आपल्या बाहेरील परिसर cctv कव्हरेज खाली आणण्यास आवाहन केले आहे .
नाशिक शहरात सेवा देत असलेल्या cctv कंपन्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाद्वारे दि 24, 25, 26 जानेवारी 2025 कालावधीत सिटी सेंटर मॉल येथे cctv expo चे आयोजन करण्यात आले आहे .
या प्रदर्शनास मा . मंत्री महोदय श्री . गिरीश महाजन यांनी आज रोजी भेट देऊन विविध cctv कॅमेऱ्यांची माहिती घेतली .
या वेळी मा विभागीय आयुक्त श्री . प्रवीण गेडाम , पोलीस आयुक्त श्री . संदीप कर्णिक , पोलीस उपायुक्त परी-1 श्री . किरणकुमार चव्हाण , पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव , स पो आ सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव , वपोनि गंगापूर श्री . सुशील जुमडे हे उपस्थित होते .