-
मनपा उर्दू हायस्कूल व म.न.पा. प्राथमिक शाळा क्रमांक ८२, ८३, ८४, ८५, येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
दिनांक २६/१/२०२५ रविवार रोजी म.न पा. उर्दू हायस्कूल व म.न.पा. शाळा क्रमांक ८२, ८३, ८४, ८५ च्या प्रांगणात ७६, वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण वडाला गावातील सामाजिक नेते आसिफ भाई शेख व संकेत खोडे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक माननीय सुनीलजी खोडे , श्यामजी बडोदे , अल्पसंख्यांक कल्याण समिती सदस्य रफिक शेख, तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका व शिक्षक वृंदाच्या उपस्थित साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्व शाळांचे विद्यार्थी – विद्यार्थिनींनी देशभक्ती पर गीत गायन केले तसेच शाळा क्रमांक ८२ च्या मुलांनी संविधान पर नाटीका सादर केली. अल्पसंख्यांक दिना निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींना जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समिती सदस्य रफीक शेख व माजी नगरसेवक सुनील खोडे , शाम बडोदे, आसिफ शेख उपस्थित पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भारती मॅडम व बिडवाई मॅडम यांनी केले.