युज नॅशनल ज्यू.कॉलेजमध्ये १०वी, १२वी साठी परीक्षेची पूर्वतयारी कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी वसीम पठाण नासिक
बोर्डाची परीक्षा जसजशी जवळ येते तसतशे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण होते. अशा वेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणेसाठी युज नॅशनल हायस्कुल व ज्यू.कॉलेजमध्ये १०वी, १२वी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेला कसे सामोरे जावे, परीक्षेचा ताण कसा कमी करावा, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, पेपर लिहताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, आरोग्य निरोगी कसे ठेवावे इत्यादी मुद्द्यांवर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले. किती तास पुस्तके घेऊन बसलात हे महत्त्वाचे नसून किती वेळ एकाग्रतेने व समझून अभ्यास केला हे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य तौसिफ़ शेख सर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला व प्रमुख वक्ते आसिफ शेख यांचा सत्कार केला. उपप्राचार्य नुरेइलाही शाह सर, शगुफ्ता मॅडम आदी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतची अनेक प्रश्ने विचारली व आसिफ शेख यांनी समाधानकारक उत्तरे देत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील परिक्षेची भीती कमी होऊन आत्मविशास वाढला असल्याचे दिसून आले.
क्रिडा प्रशिक्षक नदीम शेख सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक जाकीर शेख सर यांनी आभार व्यक्त केले.