“पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम “
प्रतिनिधी माजिद खान नासिक मा. मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत पोलीस आयुक्त व पोलीस अधिकारी, अंमलदारांची नागरीकांना भेट.
क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक ०७/०१/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालीका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing), मा. उप मुख्यमंत्री (नगरविकास, गृहनिर्माण), मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व मा. मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत संबोधीत केले.
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला असुन, त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकीय कार्यालयांकरीता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुदयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
१) संकेतस्थळ (Website) २) सुकर जीवनमान (Ease of Living) ३) स्वच्छता (Cleanliness) ४) जनतेच्या तक्रारीचे निवारण (Grievance Redressal) ५) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place) ६) गुंतवणुक प्रसार (Investment Promotion) ७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field Visits) इत्यांदी मुदयांवर नागरीकांकरीता कृती आराखडा तयार करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
दिनांक २२/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर तसेच सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त यांनी नागरीकांच्या तक्रारी जाणुन घेण्याकरीता नाशिक शहरातील विविध ठिकाणी नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन त्यांच्या अडचणी, समस्या समजुन घेवुन त्यांचे अडचणी व संमस्यांची दखल घेतली असुन त्याप्रमाणे तक्रारींचे निरसण करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
नियोजनाप्रमाणे मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पंचवटी पोलीस ठाणे अंतर्गत रामकुंड येथे जावुन नागरीकांची भेट घेतली व नागरीकांनी पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधला. भेटीसाठी आलेल्या नागरीकांनी त्यांच्या स्थानिक अडचणी पोलीस आयुक्तांसमोर मांडलेल्या असुन त्याची नोंद घेण्यात आली असुन त्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) यांनी पाटीलनगर गार्डन, त्रिमुर्तीचौक सिडको नाशिक, मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांनी दुधबाजार पोलीस चौकी, भद्रकाली नाशिक, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिकरोड व मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) हे सातपुर गांव पोलीस चौक या ठिकाणी उपस्थित राहुन नागरीकांच्या तक्रारी जाणुन घेतल्या.
तसेच उर्वरीत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मा. श्रीमती पद्मजा बढे यांनी आडगागाव येथे, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, मा. श्री नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, स.वाडा विभाग यांनी कुलकर्णी गार्डन, सरकारवाडा पोलीस ठाणे, मा. श्री. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग यांनी आनंदनगर पोलीस चौकी, इंदिरानगर पोलीस ठाणे, मा. श्री. सचिन बारी, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी १२५ शाळा, नॉगिंग ट्रॅक, उपनगर पोलीस ठाण, मा. श्रीमती संगिता निकम, सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी शिवाजीनगर पोलीस चौकी, गंगापुर पोलीस ठाणे, मा. डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हेशाखा यांनी अशोका मार्ग सिग्नल, पोलीस चौकी जवळ, मुंबईनाका पोलीस ठाणे मा.श्री. अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा यांनी भगुर पोलीस चौकी, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व मा.श्री. प्रविण चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थीक गुन्हे यांनी भोर टाऊन शिप, जाधव सकुंल, चुंचाळे पोलीस चौकी येथे भेट देवुन नागरीकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
सदर ‘पोलीस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाला नाशिक शहरातील नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन यामुळे नांगरीकांनी सदर उपक्रमाची प्रशंसा केली असुन भेट देणा-या अधिकारी व अंमलदारांचे आभार मानले आहेत.
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडयाची प्रभावीपणे सुरूवात मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे.