जिल्हाधिकारी नाशिक,यांना भारत मुक्ती मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक
आज दिनांक 22 जाने 2025 रोजी मा. वाघ साहेब,निवासी जिल्हाधिकारी यांना नाशिक,भारत मुक्ती मोर्चा तर्फे भारतीय बेरोजगार मोर्चा च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले कि,माजी सैनिक चंदू चव्हाण व इतर जवान यांच्या वर होत असलेल्या अन्याय बाबत, व जवानांना चुकीच्या व अयोग्य पद्धतीने सेवीतून बडतर्फ केले जात आहे,व पेन्शन देखील दिली जात नाही.तसेंच त्यानंच्या बडतर्फ पत्रावर शेरा दिला जात असल्यामुळे त्याना इतर कोणत्याही क्षेत्रात जॉब दिला जात नाही त्यामुळे अशा सैनिकांना बेरोजगार व्हावी लागत असून भारतीय संविधानाच्या कलम 16 व 21 चे उ्लंघन होत आहे.त्यामुळे भारतीय बेरोजगार मोर्चा मार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रतील जिल्हाअधिकारी यांना निवेदन दिली गेली आहे, नाशिक येथे भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष ऍड अमोल पठाडे, भारतीय बेरोजगार मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास गांगुर्डे, ऍड रवी कांबळे,रविंद्र सैदाणे व आदिवासी एकता परिषद कार्यकर्ते गुलाब कर्टूले यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्याचे निवेदन दिली.