नासिक द्वारका उड्डाणपुलावर मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने पाठीमागून जाेरदार धडकदिली प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक शरीरात सळई शिरुन ५/६ ते जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहेत. द्वारका चौकातील उड्डाणपुलावर सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
अपघातात १) संतोष मंडलिक (५६ ), २) अतुल संतोष मंडलिक (२२ ), ३)चेतन पवार ४) यश खरात, ५ ) दर्शन घरटे,
या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
तर १ अरमान खान २ सार्थक सोनवणे, ३ प्रेम मोरे, ४ राहुल साबळे, ५ विद्यानंद कांबळे, ६ समीर गवई, ७ अनुज घरटे, ८ साई काळे, ९ मकरंद आहेर, १० कृष्णा भगत, ११ शुभम डंगरे, १२ अभिषेक, १३ लोकेश जखमी झाल्याचे समजते.
या अपघाततील सर्व सिडकोतील सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत, टेम्पोने देवदर्शनासह नवस पूर्तीसाठी गेले होते. नाशिककडे परतताना हा टेम्पो उड्डाण पुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला, मुंबईच्या दिशेने लोखंडी सळई या घेऊन ट्रक चालला होता. मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला. या अपघातगस्त भीषण अपघातात पाच जणांच्या डाेक्यासह शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पाच जणांचा रुग्णालयात पोहोचण्या पुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी उड्डाणपूलावर धाव घेतली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक संताेष नरुटे, निरीक्षक श्रीनिवास देशमुख, डीबी पथकासह शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले.