प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर मकरसंक्रांतीच्या पार्श्व भूमीवर महावितरण तर्फे विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विजेच्या संदर्भामध्ये जनजागृती नांदूर शिंगोटे येथील सहाय्यक अभियंता श्रीराम इप्पर यांनी व्ही पी नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शनात त्यांनी पतंग उडवताना होणारे अपघात आणि पतंग उडविताना घ्यावयाची काळजी, व विद्युत यंत्रणेबाबत माहिती दिली मकरसंक्रांतीच्या पार्श्व भूमीवर महावितरण तर्फे विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विजेच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून नांदूर शिंगोटे येथील सहाय्यक अभियंता श्रीराम इप्पर यांनी व्ही पी नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शनात त्यांनी पतंग उडवताना होणारे अपघात आणि पतंग उडविताना घ्यावयाची काळजी, व विद्युत यंत्रणेबाबत माहिती धातू मिश्रित मांजा नायलॉन मांजा हा अतिशय धोकेदायक आहे तो विजेचा सुवाहक आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो मांजा अडकून वाहिन्या नादुरुस्त होतात विद्युत पुरवठा खंडित होतो पतंग उडवताना मोकळ्या जागेत व काळजीपूर्वक उडवावे असे विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले, त्याच बरोबर मागेल त्याला सोलर पंप, रूफ टॉप सोलर कसे फायद्याचे आहे याबद्दल विद्यार्थांना माहिती दिली.