अन्य

परप्रांतीय मोबाईल विक्रेत्याची ग्राहकाला मारहाण : छायाचित्रकाराला धक्काबुक्की

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक

              मोबाइलचे कव्हर खरेदी न केल्याची कुरापत काढून महात्मा गांधी रोडवरील मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. २४) दुपारी घडली. यावेळी मोबाइल विक्रेत्यांनी छायाचित्रकाराला धक्काबुक्की केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

                 प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक मोबाइलचे कव्हर खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला. मात्र त्यास कव्हर पसंद न पडल्याने त्याने कव्हर घेतले नाही. त्यामुळे आमचा वेळ वाया घालवला अशी कुरापत काढून तेथील परप्रांतीय दुकानदारांनी गोळा होऊन युवकास दमदाटी करीत बेदम मारहाण केली. भररस्त्यात हा प्रकार झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली होती तसेच काही वेळ वाहतूक कोंडीही झाली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवकाची सुटका केली. याआधीही मोबाइल साहित्य विक्रेत्यांकडून खरेदीसाठी अरेरावी केली जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात आले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 9822817037 / 9822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत