अन्य

धक्कादायक : इगतपुरी तालुक्यात आश्रमशाळेत दोन मतिमंद विद्यार्थांचा मृत्यू

Spread the love

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक

             मतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

                  हर्षल गणेश भोईर व मोहम्मद जुबेर शेख अशी दोघं विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तर चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी सुरू झाली असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम बी देशमुख पथकासह दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी खाल्लेले अन्नाचे नमुने जमा करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अनुसयातत्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंद्रागा भरती कर्णबधिर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयं सहाय्यता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थांची नावे आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 9822817037 / 9822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत