*शब्दशेष काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व काव्यमैफिल संपन्न!*
मंगळवेढा येथील शब्द शिवार निर्मित कवी आनंद कोकरे बी डी ओ साहेब लिखित शब्दशेष काव्यसंग्रहाची द्वितीय आवृती प्रकाशन सोहळा व आनंद कोकरे साहेब यांच्या वाढनिमित्त मैत्रसंध्या निमंत्रित कवीची काव्यमैफिल आयोजित करण्यात आली होती सुरूवातीला मराठी हिंदी गाणी सादर करून स्वागत करण्यात आले असून गायक नवनाथ साळवे अनिल गायकवाड स्वरबद्ध गीत सादर केली या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष पाशाभाई पटेल शेतकरी संघटना मा श्रीकांत देशमुख ज्येष्ठ लेखक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते यांच्या शुभहस्ते शब्दशेष काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे पंढरपूर मंगळवेढा भूमीपुत्र आमदार समाधान दादा आवताडे प्रा शिवाजीराव काळुंगे तसेच माजी आमदार विक्रमसिंह सावंत ॲड नंदकुमार पवार सचिन जवळकोटे नितीन मोरे अंकुश पडवळे डॉ औदुबंर जाधव हरि
प्रतिनिधी रत्नदीप जाधव नासिक रोड
यादव सीताराम सावंत रविंद्र लोकरे सुदर्शना कोकरे संतोष दुधाळ ॲड भारत पवार राजू रायबान क्वी प्रा सुरेश शिंदे राजेंद्र दास प्रकाश गायकवाड नगराध्यक्ष मंगळवेढा अशोकराव शिंदे माजी आमदार हे मान्यवर उपस्थित होते
शब्दशेष काव्यसंग्रह कवी आनंद कोकरे मनोगतात म्हणाले जे बोलायचे असते ते मी विहीत असतो असे बोलले माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले कोकरे यांच्या चार ओळीत अर्थबोध सांगणारी कविता असून जीवनचा अर्थ मांडणारे चळवळ साहित्य सामाजिक सत्व जपणारा कार्यकर्ता सोलापुर जिल्ह्याची ओळख करून देणारे एकमेव कवी पोलीस अधिकारी बी डी ओ आनंद कोकरे साहेब हे होय ज्येष्ठ साहित्यिक कवी सुरेश शिंदे म्हणाले कवितेचा जन्म वेदनेतून होतो आनंद कोकरे हे नितांत चिंतनशील कवी आहे सत्य मांडताना पुरोगामी विचारांचा पुन्हा पुन्हा जन्म होता असतो असे प्रतिपादन केले
डॉ राजेंद्र दास म्हणाले आनंदाने कविता लिहिली म्हणून आनंद जीवनात आहे स्वताशी संवाद करतो तो कवी अवतीभवतीचा शोध घेणारा कवी असून हटवादी निशंक गर्भवास हवा मोक्ष नको संन्यास नको कविता आणि माणसे वाचणारा कवी शब्दशेष लिहिणारा आनंद कोकरे
मा श्रीकांत देशमुख म्हणाले कवी म्हणजे थोर गोष्ठ आहे सहजीवनाचा मूलमंत्र जपला पाहिजे परंपरा संस्कृती गावगाडा पाहणारा कवी आनंद कोकरे साहेब आहेत दारात सूर्य ठेवू गेलो असे लिहिणारे फक्त कवी जिवंत आहे हां ज्वलंत विषय आहे असा आशावाद मांडला
अध्यक्षीय भाषणात पाशाभाई पटेल म्हणाले दुःख आनंद वाद संवाद कवितेत मांडलेला दिसतोय या जगाचा धनी कवी आहे निर्मळ मनाचा कवी आनंद आहे.
काव्यमैफिलचे अध्यक्ष सुरेश शिंदे निमंत्रित कवी भगवान निळे डॉ राजेंद्र दास राधिका फराटे रानकवी जगदीप वनशिव माणदेश डॉ लक्ष्मण हेंबाडे कवी माने जितेंद्र लाड या मान्यवर कवीनी ग़झल मुक्तछंद लावणी श्र्वास प्रेमगीत चोखामेळा अशा रचना सादर करून रसिकांची मने जिंकली टाळ्यांच्या गजरात स्वागत केले सर्व मान्यवर कवीचा सत्कार शाही टोपी शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले या काव्यमैफील चे सूत्रसंचालन कवी प्रकाशन इंद्रजीत घुले यांनी बहारदार दमदार मृदूल आवाजात शीघ्र चारोळ्या चुटके शेर शायरी आपल्या मायबोलीत केले मंगळवेढा येथील सामी फॅमिली क्लब ॲड रिसॉर्ट येथे संपन्न झाला मंगळवेढा येथील रसिकांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा व काव्यमैफिल संपन्न झाली.