शिक्षा

सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी कडून शालेय विध्यार्थीनां साहित्य वाटप करण्यात आले.

Spread the love

सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी कडून शालेय विध्यार्थीनां साहित्य वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी बाबूजी शेख नासिक

४ जानेवारी २०२५ रोजी कै. मा. ब. उर्फ काकासाहेब देशमुख विद्यालय पंचवटी नाशिक येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी कडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण तसेच आदिवासी पाडा भागातील जीवनशैली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर निंबेकर सर यांनी आपल्या प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले.
सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी चे संस्थापक शामराव भोसले ह्यांनी विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे, ज्ञान घेतले पाहिजे, गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे तर मोठे झाल्यावर प्रगतीची शिखरे गाठता येतील. सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी माध्यमातून तुम्हाला सहकार्य केले जाईल असे संचालक अभिजित भोसले यांनी सांगितले. यावेळी सद् धम्म हॉलिडे, भोसले टूर्स कंपनी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता चव्हाण मॅडम तसेच आभार समारंभ तेजश्री जोशी मॅडम ह्यांनी मानले. विध्यार्थी गृहाचे स्टाफ श्रीम. सुनंदा ठाकरे मॅडम, श्री. तुकाराम मंडले सर, सौ. अस्मिता बाबधनकर मॅडम, श्री. गौरव झुरडे सर, श्रीम. अर्चना कोकण मॅडम, श्री. भालचंद्र कुलकर्णी सर तसेच, सम्राट सोनवणे, अशोक गवळे, जयंत निकम, शंकर सोळंके, आनंद पवार, तेजस साळवे, गणेश पाईकराव, अविनाश साळवे, कार्तिक निकम, अमोल मानकर, सिद्धांत मोरे, शिवम पवार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत