मशिदी खाली मंदिर विरोधात १९९१चा कायद्याची आठवण करून देण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बडी दर्गा नाशिक सह्याची मोहीम
प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक नासिक मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे कायदा १९९१ ची आठवण करून देण्या साठी व सध्या देशात सुरू असलेल्या मशिदी खाली मंदिरे शोधण्याचा तसेच अजमेरच्या दर्गाखाली शिवमंदिर असल्याबाबत विविध न्यायालयामध्ये केसेस दाखल करण्याचे काम सुरू आहे परंतु आपल्या देशातील लोकशाही मानणाऱ्या लोकांनी 1991 सली लोकसभेत एक कायदा पास केलेला आहे 1947 नंतर ज्या ठिकाणी मशिद आहे त्या ठिकाणी मशिद राहील ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिर आहेत परंतु काही जातीयवादी शक्ती देशाचं वातावरण खराब करण्यासाठी विविध प्रकारचे खोटे पुरावे तयार करून कोर्टामध्ये केसेस दाखल करत आहेत व कोड सुद्धा त्यामध्ये सर्वेचे आदेश देऊन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने नाशिक येथे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांना एका निवेदनाद्वारे 1991 सालचा कायद्याची आठवण करून देण्यासाठी सयांची मोहीम चालून आणि त्या सर्व सह्यांचे निवेदन पाठवण्यात येणार आहे आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सयांची मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमात मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण मुस्ताक शेख मुख्तार शेख सलीम खान अखिल खान नदीम मणियार आदी कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदन हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठवण्यात येणार आहे