जनता विद्यालयात वीर बाल दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न प्रतिनिधी सनी गोसावी निफाड
पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे, कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशान्वये, जिल्हा परिषद माध्यमिक विभाग पंचायत समिती निफाड यांच्या अंतर्गत विद्यालयात वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 26 नोव्हेंबर….वीर बाल दिवस, शिक्षण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत इतिहासातील बाल वीरांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी सुरू केला आहे. या दिवशी त्या बाल वीरांच्या पराक्रमांना वंदन करतो ज्यांनी देश, धर्म आणि सत्यासाठी आपले जीवन समर्पित केले. विशेषता: गुरुगोविंद सिंग यांच्या चार सुपुत्रांचे बलिदान यासाठी अत्यंत स्मरणीय आहे.
वीर बाल दिवसाच्या निमित्ताने विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी शौर्यपूर्वक कामगिरी केलेल्या अशा विद्यार्थ्यांचा गौरव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय डेर्ले सर, जेष्ठ शिक्षिका श्रीम सरला डंबाळे मॅडम, श्रीम वंदना कदम मॅडम, तशेच सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विद्यालयात निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, कविता, वादविवाद स्पर्धा, डिजिटल प्रश्न मंजुषा स्पर्धा सादरीकरण, यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये वीरता हे मूल्य अंगीकारण्यासाठी व दुसऱ्याला सहकार्य वृत्तीने तसेच लढवू वृत्तीने मदत करण्याचं धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी वरील विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शौर्यतेचे महत्व समजवण्यात आले. फलक लेखन विद्यालयाचे कलाशिक्षक अनिल शिरसाठ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश कुशारे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संदीप गडाख सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले