Uncategorized

पालघर जिल्हा पोलीस अधीक्ष जव्हार दरगाहच्या उरुसदर्शनाला; शांततेत ऊर्स संपन्न झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा 

Spread the love

पालघर जिल्हा पोलीस अधीक्ष जव्हार दरगाहच्या उरुसदर्शनाला; शांततेत ऊर्स संपन्न झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

 

 

प्रतिनिधी अर्शद अन्सारी जव्हार:            जव्हार शहरात औलिया पीर शाह सदरोद्दीन बाबा यांचा उरूस शांततेत संपन्न झाले यात हजारोंच्या संख्येने भाविक दर दिवशी आपली आस्था प्रकट करण्यासाठी आलेली होती यात कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन व निर्गमण केल्याची पालघर एस. पी. यांनी भेट देऊन पाहणी केली. ५७२ वर्षांची परंपरा लाभलेल्या जव्हार शहरातील संस्थानकालिन सार्वजनिक कार्यक्रम स्थानिक हिंदू , मुस्लिम बांधवांचा सामाजिक ऐक्य जपणाऱ्या उरुससाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक, बाळासाहेब पाटील (आय.पी.एस.) यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत दर्ग्याचे दर्शन घेवून सबंध जव्हार वासियांना उरुस निमित्त शुभेच्छा दिल्या.

जव्हार चा उरुस हा सर्वदूर प्रसिद्ध आहे, यासाठी पर राज्यातून देखील भाविक येत असतात, या सामाजिक सलोखा जपणाऱ्या उरुसाची महती ऐकून होतो, परंतु आज प्रत्यक्षात दर्शन घेवून प्रार्थना करून स्वतः अनुभव घेतला, जव्हार शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले असल्याचे या वेळी पाटील यांनी सांगितले, तर पिढीजात परंपरा बाबत येथील प्रतिष्ठित स्थानिक नागरिक नरुशेठ तेंडुलकर यांनी या उरुसाची सुरुवात कशी व कोणी केली यातील प्रथा परंपरा सांगत या संस्थानकालीन कार्यक्रमाची माहिती दिली.

    या वेळी जव्हार शहरातील सर्व नागरिक ऊर्स जलसा कमिटी यांच्या वतीने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रशासनाने घेतलेल्या अथक परिश्रमासाठी आभार व्यक्त करून स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत