Uncategorized

५७२ वर्षाची परंपरा असलेला जव्हार व इगतपुरी सद्रो पिपंरी येथील प्रसिद्ध शाही उरूसाची सुरवात

Spread the love

*५७२ वर्षाची परंपरा असलेला जव्हार व इगतपुरी सद्रो पिपंरी येथील प्रसिद्ध शाही उरूसाची सुरवात* प्रतिनिधी अर्शद अन्सारी जव्हार
जव्हार शहरात पाचशे बहात्तर वर्षाची परंपरा असलेल्या शाही उरुसाला २३ सप्टेंबर ला सुरवात होऊन २५ तारखेपर्यंत इस्लामिक पद्धतीने संदल, चादर, लंगर व कव्वाली च्या बहारदार व भरगच्च कार्यक्रमांद्वारे जल्लोषात साजरा होणार आहे, त्यासाठी स्थानिक मुस्लिम जमातिची उरूस कमिटी, नगर परिषद व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे मुस्लिम जमात उरूस समिती कडून सांगितले.
जव्हार शहराला राजाश्रय लाभल्याने अनेक चांगल्या परंपरा , रुढी येथे अनेक काळापासून आजही चालू आहेत . यातीलच जव्हारचा सुप्रसिद्ध उरुस. सर्व धर्मीय स्थानिक बांधव एकोप्याने हा उरुस वंशपरंपरागत साजरा करीत आले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणूनही त्याची नोंद आहे देशभरात घेतली जाते.
हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती यांचा हा उरुस ज्याची मुळ मजार ही इगतपुरी तालुक्यातील मौजे पिंपरी सद्रोद्दीन येथे स्थित आहे मराठी भाद्रपद मध्ये येणाऱ्या कोणत्याही उर्दु महिन्याच्या २० तारखे नुसार व जव्हार येथे परंपरागत एक दिवस अगोदर हा उरूस दोन्ही ठिकाणी संयुक्तरित्या साजरा केला जातो. वंशपरंपरांगत हे पुढे आजही चालू आहे.
यावेळी लगतच्या जिल्ह्यातील व गुजरात राज्य आदि ठिकाणाहून भाविक येतात , तर जव्हारमधील मान्यवर, मुस्लिम बांधव व सर्व धर्मीय एकोप्याने या उरुसात मोठ्या संख्येने उपस्थित राहतात . या दर्ग्याच्या उरुसाची तारीख ही मौजे पिंपरी ता. इगतपुरी जि. नाशिक येथील दर्ग्यावरून घेण्यात येते असे जाणकार मंडळींनी सांगितले.
जव्हार शहरातील उरुस याचे महत्व प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून परंपरेचे पावित्र्य राखावे.
गणपतराव पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी,जव्हार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत