जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यालय संघ उपविजेता
जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने 14 वर्षातील नाशिक ग्रामीण शालेय जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा निफाड येथील लासलगाव येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये सरस्वती विद्यालय निफाड चे खेळाडूंनी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजेता पद मिळवल्याबद्दल
जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट उद्घाटन प्रसंगी क्रीडा आधिकारी अजिंक्य दूधारे ,टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक सचिव विलास गायकवाड, खेळाडू व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक मधून मुलांचे व मुलींचे एकूण 31संघ उपस्थित होते. राष्ट्रीय पंच व जिल्हा सचिव टेनिस क्रिकेट मार्गदर्शक विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व नियम सांगितले.जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना योगेश्वर विद्यालय दावसवाडी विरुद्ध सरस्वती विद्यालय यांच्यात झाला. योगेश्वरच्या खेळाडूंनी नेत्रादीपक कामगिरी करत विजयश्री मिळवला. सरस्वती संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.सरस्वती मुलीच्या संघा मध्ये कर्णधार आराध्या सालमुठे,अनुष्का कुशारे,वेदिका कुशारे,मोक्षदा जाधव,स्वानंदी बिदे,आराध्या सानप,श्रद्धा मोगल,तनिष्का निकम,
अनुष्का गांगुर्डे,कृतिका मोगल,श्रावणी तूपलोंढे,सर्वज्ञा पवार
धनश्री पातळे यांनी अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजयी ठरल्याबद्दल ग.कौ.सदस्य तथा सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलालजी चोरडिया, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बागडे, वैशाली जाधव, प्रतिभा मानकर, सविता खैरनार, सोनाली निकम,ज्योती सानप, अश्विनी गांगुर्डे, शारदा काजळकर, छाया चव्हाण, निलम बेंडकुळे,हिना पठाण,प्रिया कुंदे यांनी अभिनंदन केले व पुढिल वाढचालीस शुभेच्छा दिल्या. संघ व्यवस्थापक म्हणून निलम बेंडकुळे यांनी काम बघितले व क्रीडा प्रशिक्षक प्रतीक्षा कोटकर ,विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.