अन्य

निफाडला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सैनिकांच्या मातापित्यांचा व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

Spread the love

दिनेश गोसावी/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता-पिंपळगाव बसवंत

                  75वा अमृत महोत्सवा निमित्ताने पंचायत समिती निफाड हॉलमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भारत मातेच्या सीमेवर वीर जवान आपल्या जिवाची पर्वा न करता देश सेवा करीत आहेत. अशा सैनिकांच्या माता, पित्यांचा, राष्ट्रीय खेळाडूंचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यावेळेस निफाड तालुक्यातील जवानांचे आई वडील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 आपल्या मुलाचे कार्याचा अभिमान वाटून उपस्थित माता पित्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. यावेळेस उपस्थित माझी सैनिक तुकाराम डोईफोडे,दत्ता महाराज वैद्य, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे,जगन काकडे,दत्ता आरोटे,नितीन गवळी,शाम गोसावी, समाधान बागल अधिवासी संघटनेचे तालुका प्रमुख सरला माळी, रमेश पवार व ज्यांनी कार्यक्रम आयोजन केले होते ते प्रहार युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष जयेश जगताप प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ, प्रहार जनशक्ती निफाड शहर अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, दिपक शिंदे, आकाश धुमाळ,विकास खडताळे, ज्ञानेश्वर आढाव सुदाम देशमुख,नयना जंगम व सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : 9822817037 / 9822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत