सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
सातपूर-अंबड लिंक रोडवर कच-यामुळे आणि गोदामाला वारंवार लागणा-या आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत आले आहे. त्या निमित्ताने येथील भंगार गाेदामाच्या समस्यांचे निरसन करावे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा निर्दशनास आले आहे. गोदामामुळे सारख्या घडणा-या आगींच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037