सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता
पुण्यात एक खळबळजनक प्रकार बिबवेवाडी परिसरात समोर आला असून सरगम चाळीच्या आवारातील खून प्रकरणाचे कारण शोधण्यात अखेर पोलिसांना यश आलेले आहे. केवळ दारू पिताना चकणा मागितला म्हणून दोन व्यक्तींनी एकाचा खून केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , शनिवारी 15 तारखेला हे प्रकरण उघडकीला आलेले होते. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलेली असून मयत व्यक्तीचीच अद्याप ओळख पटलेली नाही तर केतन शाम टेमकर ( वय 19 ) आणि ओंकार लक्ष्मण सनस ( वय 22 दोघेही राहणार राजीव गांधी नगर बिबवेवाडी ) अशी संशयित व्यक्तींची नावे आहेत.
सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत 15 तारखेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पोलीस तपास सुरू असताना वरील दोन्ही आरोपींनी हा प्रकार केल्याचे समोर आले आणि पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी दारू पिताना अनोळखी व्यक्तीने चकना मागितला होता तो आपण दिला नाही म्हणून वादावादी झाली त्यावेळी आपण त्याच्या डोक्यात दगड घातला अशी कबुली दिलेली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037