आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
बार्शी तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून बार्शी पोलिसांचा या चोरट्यांवर चांगलाच वॉच आहे. त्यानुसार, शहर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं. ५७५/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९, ३४, ४११ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल घेवुन दोन इसम कुर्डुवाडी बार्शी रोडने शिवाजीनगर बार्शी येथून जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना जैन मंदीर कुर्डुवाडी रोड येथे चोरट्यांना पकडले.
पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या आदेशान्वये जिल्हयातील मोटारसायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या मोहिमेतून पोलीस उपअधिक्षक बार्शी विभाग जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपींची नावे ०१) गोपाळ महादेव निकम वय ३० वर्षे, रा. भोईजे बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर, २) खंडू चंद्रकांत सुरवसे, वय ३३ वर्षे, रा. जहागीरवाडी, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. खामगाव, बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर अशी असून त्यांचे जवळ असणारे मोटार सायकल बाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरील मोटार सायकल ही श्री भगवंत मंदीर बार्शी येथुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्यांच्याकडून बार्शी शहर, बार्शी तालूका, वैराग, सोलापूर तालूका या भागातुन चोरुन आणलेल्या एकुण २,५५,०००/- रू किंमतीच्या ०७ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037