अन्य

एस.टी. स्टँडवर चोरी करणारी सराईत महिला गुन्हेगार जरेबंद*, *3,46,700/- रुपयेचे सोन्याचे दागिने हस्तगत, एकुण 8 गुन्हे उघड

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                   सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध एस. टी स्टँड येथे महिलांचे दागिने चोरीस गेले होते त्याबाबत विविध पोलीस ठाणे येथे चोरी गुन्हे दाखल आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांनी सदर गुन्हयांची गांर्भीयाने दखल घेवुन नमुद गुन्हे उघडकीस आणणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाकर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या होत्या.

                  सदर सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व त्यांचे पथकास आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध एस टी स्टॅंड वर चोरी झालेले घटनास्थळी भेट देवुन संशयीत आरोपी यांची माहिती प्राप्त केली.

                सदर आरोपीत यांची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मोहोळ एस टी स्टँड येथे चोरी करणारी महिला आरोपी नई जिंदगी, सोलापूर शहर येथे येणार आहे. सदर पथकाने तात्काळ नई जिंदगी, सोलापूर येथे जावुन नमुद महिला आरोपीस ताब्यात घेतले. सदर महिला आरोपीने सुरवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली. पंरतु तिच्याकडे केलेल्या सखोल तपासात तीने मे-2023 मध्ये मोहोळ एस टी स्टँड येथे बसमध्ये चढताना एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याचे कबुल केले. तिच्याकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे सदर महिला आरोपी हिने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

            नमुद महिला आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे तिच्याकडुन रुपये 3,46,700/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर महिला आरोपीस मोहोळ पोलीस ठाणे गुरंन 395/2023 भादवि क. 379 या गुन्हयात दिनांक 09/07/2023 रोजी अटक करण्यात आली असुन सध्या सदर महिला आरोपी मोहोळ पोलीस ठाणेच्या पोलीस कोठडीत आहे.

                    सदर उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक, श्री हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण. यांचे नेत्तृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, श्रेणी पोसई / राजेश | गायकवाड, सपोफौ/ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोहेकॉ / सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, | विजय भरले, सुहास नारायणकर, मपोहेकॉ / मोहीनी भोगे, पोना/रवी माने, मपोना / पल्लवी इंगळे, ज्योती काळे, पोकॉ/ समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, चापोशि/ दिलीप थोरात यांनी केली आहे.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत