अन्य

जेजुरीत ‘”शासन आपल्या दारी’” कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला;कार्यक्रमच झाले रद्द

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

                जेजुरीत शासन आपल्या दारी आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य-दिव्य असा मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. साधारणपणे 1 लाख 57 हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे 21 हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेले अनेक दिवसांपासून भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेत आठवड्यापासून याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

           सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाडा कोसळला तेव्हा सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली मात्र कार्यक्रमापूर्वीच हा अपघात झाल्याने भविष्यातील मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरु आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत