खलील शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मालेगाव
शिरवाडे वणी फाट्यावर रात्री अकराच्या सुमारास दुचाकी परिवहन महामंडळाच्या बसचा व मोटार सायकल चा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिरवाडे वणी गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवाडे वणी फाट्यावर रात्री अकराच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH 17 BR 7972 हिला नाशिककडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक (MH 20 BL 2461ने जोरदार धडक दिली.या धडकेमुळे दुचाकी लांब फरफटत गेल्याने अपघातात दुचाकीवर बसलेले मयुर चंद्रकांत निफाडे वय 35 सुभाष माणिकराव निफाडे वय 36 नितीन भास्कर निफाडे वय 32 यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसचालक दिपक शांताराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातात मयत झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील होते. तसेच या तिघांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह शिरवाडे वणी गावावर शोककळा पसरली असून तिघांवर आज सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037