जुल्फीकार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात, ममदापूर हे दहा पंधरा हजार लोक वस्ती असलेले गाव असून येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असतात. ममदापूर गावात मुस्लिम समाजाची संख्या भरपुर प्रमाणात असुन हिंदु समाज मळ्यात वाड्या रस्त्यावर रहातात. गावाचे विशेष वैशिष्टय असे की या गावचे ग्रामदैवत हे पिर दिवानशहा मोहब्बतशहा कादरी उर्फ अल्ली बाबा असुन गावात दोन्ही धर्माची लोकं एकमेकांच्या सणा मध्ये सहभागी होवुन कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. या वर्षी हिंदु धर्मात पवित्र आषाडी एकादशी (पंढरपुर यात्रा) व मुस्लिम धर्मात पवित्र असलेला बकरी ईद सण एकाच दिवशी म्हणजे 29 जुलै रोजी येत असल्याने बकरी ईदच्या सणाला मुस्लिम बांधव तीन दिवस जनावरांची कुर्बाणी देवुन सण साजरा करतात. दोन्ही समाजात ऐकोपा राहावा व धार्मिक उत्सव शांतेत पार पाडावे या हेतुने मुस्लिम आणि हिंदु बांधवांनी सांमजस्य दाखवत आषाडी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या तीसऱ्या दिवशी ऐसामाजिक सलोखा मिटीग मध्ये घेण्याचे ठरवले. यात दोन्ही समाजात सलोख्याचे वातावरण रहावे या करिता लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.युवराज आठरे साहेब यांनी पढाकार घेवुन जिल्ह्यात नव्हे तर सबंध महाराष्ट्रात इतिहासात नोंद होइल ऐतिहासिक कार्य करण्याचे काम केले. मिटिंग ला दोन्ही समाजाचे लोक सामाजिक राजकिय पुढारी पोलिस निरीक्षक मा.युवराज आठरे सहेब त्याचे सहकारी पोलिस प्रवरा सह.साखर कारखान्याचे संचालक सतिष अण्णा ससाने, ममदापुर गावचे पोलिस पाटील ज्ञानदेव कळमकर पा., माजी उपसरपंच ईफ्तेकार पटेल, हाजी सय्यद मुस्ताक पटेल, महेबुब (भैय्या भाई) अब्दुल करीम कुरेशी जब्बार कुरेशी, ग्रा.प.सदस्य लतीफ भाई इत्याादी उपस्ती्थि होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037