सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा
उपसभापती प्रदिप वाघ यांचे प्रतिपादन,मोखाडयात निवृत्त झालेल्या बांधवांच्या सन्मानासाठी सोहळा
समाजासाठी आपल्या आयुष्यांची अनेक वर्ष वेचणारी असंख्य मंडळी असतात नौकरीच्या निमित्ताने का होईना अखंडित सेवा देवून एक दिवस निवृत्त होतात मात्र या निवृत्तसेवकांचा सन्मान होताना दिसत नाही तसेच याभागातील अनेक तरुण तरुणी गरीबी घरचे अठराविश्व द्रारीद्य अशा परीस्थिती झुंज देवून पोलिस अग्नीशमक दल सैनिक होतात यांच्या कष्टाचे चीज व्हावे त्यातून बाकी तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्दात हेतूने यासर्वांचा भव्य दिव्य सत्कार करण्यासाठी ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन केले असून समाजाशी ऋणानुबंध जपलेल्या आमच्या माणसाना माझ्या माणसांच्या कार्याला सलाम करण्यासाठीही हा सोहळा कार्यक्रम घेतल्याचे प्रतिपादन उपसभापती प्रदिप वाघ यांनी केले.वाघ हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या आदिवासी हक्क संघर्ष समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी वाघ यांनी सांगितले कि ऋणानुबंध समाजाचे या जाणीवेतून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपण वागलो तर हा ऋणानुबंध कायमच जोपासला पाहिजे.समाजातील गुणवंतांचा सत्कार आपण करणार नाही तर दुसरा कोण करेल.दुसर्याचे सुख दुःख अडीअडचणीला सामोरे जाऊन समाजातील गोरगरीब जनतेसाठी मदत करणे हा आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चा मुख्य उद्देश आहे.समिती सदस्य स्वताचा पैसा व वेळ खर्च करतात असेही त्यांनी सांगितले.ऋणानुबंध सोहळा सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनआज खोडाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य स्वरुपात ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने करण्यात आले होते.
यावेळी सेवा निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी नंदकुमार वाघ, सखाराम रेरे, सुरेश हमरे, नामदेव सारक्ते, पोलिस दलात निवड झाल्याबद्दल प्रवीण हमरे, संदीप टोके, श्रीमती मोहिनी भारमल यांची अग्निशमन दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच रामचंद्र विशे विस्तार अधिकारी, रंजना जोशी, गणेश मुकणे यांचा देखील सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद कदम, जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले, पंचायत समिती सदस्य आशा झुगरे,कुलदीप जाधव गटविकास अधिकारी, भाऊसाहेब चत्तर तालुका वैद्यकीय अधिकारी, जेष्ठ नेते भरत गारे, गुरुजी, रघुनाथ पवार, डॉ मिठाराम कडव, सरपंच एकनाथ दरोडा, कविता पाटील,लता वारे, नरेंद्र येले,गीता पाटील, हनुमंत फसाळे, रवि धिंडा,उपसरपंच नंदकुमार वाघ, परशुराम अगिवले,उमेश येलमामे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू हमरे, संजय वाघ, रमेश बोटे,दिलीप जागले, मिलिंद झोले, प्रभाकर पाटील, नामदेव पाटील, संजय साळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश दाते, विठ्ठल गोडे, दिनकर फसाळे, योगेश खोरगडे यांनी केले.प्रास्तविक संतोष पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी मोहीते कॉलेज चे सचिव दिपक कडलग तसेच आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे सदस्य अनंता वारे, गणेश वाघ, गणेश खादे, नरेंद्र वाघ, निलेश झुगरे,चुनिलाल पवार सर, अक्षय कोरडे,शुभम दुर्गुडे अंकुश वाघ,राजा जोशी, दशरथ पाटील इत्यादी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037