अन्य

दहावीच्या परीक्षेत मिस्त्री हायस्कूलच्या सुमय्या सय्यद हिने मिळवले शंभर टक्के गुण

Spread the love

                    रत्नागिरी दहावीच्या परीक्षेमध्ये मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी सुमय्या मोहिनुद्दीन सय्यद हिने शंभर टक्के गुण मिळविले आहे. प्रशालेच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

                      संपूर्ण राज्यात १०० टक्के मार्क्स घेणारे एकूण १५१ विदयार्थी आहेत. त्यामध्ये सुमय्याचा समावेश आहे. यापूर्वीही सुमय्या सय्यद या विद्यार्थिनीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (२०१८) संपूर्ण कोकण विभागात उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला होता.

                 तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक जुबेर गडकरी, तसेच तालिमी इमदादिया कमिटीचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तनवीर मिस्त्री, सहसचिव जाहीर मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार निसार लाला, संस्थेचे संचालक शकील मजगावकर, रफिक मुकादम, साबीर मजगावकर, प्रशालेचे पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी सुमय्या, तिच्या पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत