अन्य

वाडा वनपाल अटकेत लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी रंगेहात पकडले

Spread the love

प्रभाकर शेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर

                     तक्रारदार पुरुष वय 33 वर्षें , आरोपी1. विजय लक्ष्मण धुरी वय 53 वर्षे वनपाल नेहरोली परिमंडळ ता.वाडा (वर्ग 3) 2. विष्णु पोपट सांगळे वय 55 वर्षे वनपाल, बाणगंगा परिमंडळ, ता. वाडा जि. पालघर ( वर्ग 3)लाचेची मागणी 10,000 रु. व एक दारूचा खंबा लाच स्विकारली एक दारुचा खंबा किंमत 760/- रु हस्तगत लाचेची मागणी दि.21/02/2023 लाच स्विकारली दि. 21/02/2023 रोजी.15:05वा. लाचेचे कारण यातील तक्रारदार हे एका बांधकाम व्यावसायिकाचेकडे मॅनेजर म्हणुन काम करत असुन त्यांचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे एन. ए. करिता नाहरकत दाखला मिळणेकामी पंचनामा कामी प्रलंबित होते. सदर प्रकरणात पंचनामा करणेचा मोबदला म्हणुन यातील आलोसे क्र. 1 यांनी रु. 10000/- व एक राॅयल स्टॅग दारूचा खंबा याची तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी करुन दारुचा खंबा तात्काळ आणुन देण्यास सांगीतले. सदर लाचेच्या मागणीस क्र. 2 यांनी प्रोत्साहन दिले.

                     त्यावरुन लाचेचा सापळा आजमाविला असता क्र 1 यांनी वनविभाग वाडा येथील शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्विकारला असता क्र.1 व 2 यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.पुढील कारवाई चालू आहे. सापळा पथक नवनाथ जगताप,पोलीस उपअधीक्षक, पोहवा/ अमित चव्हाण,विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा,पोना/स्वाती तारवी मार्गदर्शन अधिकारी मा.श्री. सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र सक्षम प्राधिकारी मा. मुख्य वनसंरक्षक, ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

👇👇👇

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पालघर

दुरध्वनी 02525-297297 पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप

मो.नं. 9923346810/ 9850158810

पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास

मो.नं. 8007290944/ 9405722011

टोल फ्रि क्रं. 1064

साजिद शेख

दक्ष पोलिस वार्ता – मुख्य संपादक

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत