अन्य

दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                नाशिक मधील दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते झाले.

             लोकार्पणाप्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोना काळात सुमारे २२० कोटी लसीकरण करून सरकारने जनतेचे रक्षण केले. भारतही लस बनवण्यास सक्षम झाला. सर्व जगात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धडाडीमुळे हे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला.

                   या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सुरगाणा परिसरातील समस्या मांडल्या. कार्यक्रमास तहसीलदार पंकज पवार, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मंगला शिंदे, नगराध्यक्ष मेघा धिंधळे, उपनगराध्यक्ष लता बोरस्ते, शहर अध्यक्ष नितीन गांगुर्डे, योगेश तिडके तसेच वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत