अन्य

ट्रॅकवर काम करणाऱ्या चार कामगारांना रेल्वे इंजिनने चिरडले

Spread the love

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

                 नाशिकरोड-मध्य रेल्वेच्या मनमाड सेक्‍शन युनिट-२ मध्ये ट्रॅकचे काम करणाऱ्या चार रेल्वे कामगारांना टॉवर मशिनने चिरडले आहे. यामुळे या कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. ही दुर्घटना पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली.

                संतोष केदारे (वय ३८), दिनेश दराडे (३५), कृष्णा अहिरे (४०) आणि संतोष शिरसाठ (३८) अशी मृत कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्‍यातील उगाव येथे रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक मन व ओव्हर हेड इक्विपमेंट (टॉवर) मशिन असे दोन पथकांना काम करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पहाटे ब्लॉक (सुरक्षित वेळ) मिळाला होता.

                   त्यानुसार नाशिकरोड येथील टॉवर वॅगन लासलगावच्या दिशेने गेले. मशिन पुढे गेल्याने उगाव येथील रेल्वे ट्रॅकला वळण असलेल्या ठिकाणी ट्रॅकमन यांनी काम सुरू केले होते. काम सुरू असताना लासलगाव येथून उलट्या दिशेने वेगाने आलेल्या टॉवर मशिनने ट्रॅकवर काम करणाऱ्या चार रेल्वे ट्रॅकमन यांना चिरडले. ट्रॅकवर काम करत असताना अचानकपणे टॉवर मशीन आले आणि कोणताही हॉर्न न देता या कर्मचाऱ्यांना उडवून पुढे निघून गेले.

              घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना तातडीने लासलगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. याप्रकरणी वॅगन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

                   दरम्यान, अपघाताला तीन तास उलटूनही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याचा ठपका ठेवत संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी मनमाड-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्‍स्प्रेस सुमारे 10 मिनिटे रोखून धरली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत