राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी दक्ष पोलीस वार्ता चांदवड
राज्य सरकारकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदी राकेश ओला तर पुणे ग्रामीण दलाच्या अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
कोणाची कुठे बदली?
धनंजय कुलकर्णी – रत्नागिरी
पवन बनसोड – सिंधुदुर्ग
बसवराज तेली – सांगली
शेख समीर अस्लम – सातारा
अंकित गोयल – पुणे
शिरीष सरदेशपांडे – सोलापूर
राकेश ओला – अहमदनगर
एम राजकुमार – जळगाव
रागसुद्धा .आर – परभणी
संदीप सिंह गिल – हिंगोली
श्रीकृष्ण कोकाटे – नांदेड
सोमय मुंडे – लातूर
सारंग आवाड – बुलढाणा
गौरव सिंह – यवतमाळ
संदीप घुगे – अकोला
रवींद्रसिंग एस. परदेशी – चंद्रपूर
नुरुल हसन – वर्धा
निखिल पिंगळे – गोंदिया
निलोत्पल – गडचिरोली
संजय एस. बारकुंड – धुळे
श्रीकांत परोपकारी – ठाणे
सचिन पाटील – औरंगाबाद
तर लक्ष्मीकांत पाटील यांची नागपूर प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राचार्यपदी नियुक्ती आणि पराग शाम मणेरे यांची विशेष सुरक्षा विभागात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037